
>> स्पायडरमॅन
काही दिवसांपूर्वी आइसलँडमध्ये डास सापडला आणि जगभरात या बातमीची दखल घेतली गेली. आपल्याकडेदेखील प्रत्येक समाज माध्यमाने यासंदर्भात मोठी बातमी केली आणि सामान्य नागरिक आश्चर्यचकित झाले. एखाद्या देशात डास सापडणे यात मोठे असे काय आहे, हे त्यांना उमजेना. मात्र आयर्लंडच्या थंड हवामानात आजवर कोणत्याच प्रजातीचे डास तग धरू शकले नव्हते आणि त्यामुळे आजवर हा देश पूर्णपणे डासमुक्त होता. मात्र आता तेथे एका बागेत दोन मादी आणि एक नर असे तीन डास सापडल्याने शास्त्रज्ञ प्रचंड चिंतेत पडलेले आहेत. हा हवामान बदलाचा आणखी एक घातक दुष्परिणाम आहे का? यावर ते तातडीने अभ्यासाला लागले आहेत.
समाज माध्यमांमध्ये या घटनेची जोरदार चर्चा सुरू असताना त्याच्या जोडीला आयर्लंडच्या एका खास वैशिष्टय़ाचीदेखील चर्चा जोर पकडू लागली आहे. आइसलँड जसे एकेकाळी संपूर्ण डासमुक्त होते तसेच आयर्लंडदेखील पूर्णपणे सापमुक्त असा देश आहे. या अनोख्या देशात एकही साप आढळत नाही. जगभरात सापाच्या साधारण तीन हजार प्रजाती आढळतात. त्यातल्या काही अत्यंत विषारी आहेत. एकटय़ा हिंदुस्थानात सापाच्या 69 विषारी प्रजाती आढळतात. त्यापैकी 40 जमिनीवर वावरणाऱया, तर 20 समुद्री सापांच्या आहेत. ब्राझीलला तर सापांचा देश म्हणले जाते. तिथे जगातील सर्वात जास्त साप आढळतात.
आयर्लंडच्या जिवाश्म अभिलेख कार्यालयातदेखील इथे कधी साप असल्याची एकही नोंद आढळत नाही. शास्त्रज्ञांच्या मते मात्र इथली आत्यंधिक थंड हवा ही इथे साप न आढळण्याचे प्रमुख कारण आहे. इथे कधीकाळी साप होते. मात्र इथल्या वाढत्या थंड हवेत ते तग धरू शकले नाहीत आणि पूर्णपणे विलुप्त झाले, तर एका पौराणिक कथेनुसार सेंट पॅट्रिक यांनी धर्मरक्षणाच्या हेतूने आयर्लंडमधील सर्व सापांना एकत्र केले आणि तेथील समुद्रात फेकून दिले. 40 दिवस उपाशी राहून त्यांनी हे कार्य पार पाडले.




























































