हिंदुंच्या भावना दुखावल्या, नव्या वेबसिरीजवरून सुरू होणार ‘तांडव’

एका राजकीय नेत्याच्या आयुष्यावर आधारित तांडव ही वेबसिरीज रिलीज होताच वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. या वेबसिरीजमधून हिंदुंच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला जात असून त्यामुळे आता तांडववरून तांडव होण्याची शक्यता आहे.  या वेबसिरीजची सगळीकडे जोरदार चर्चा सुरु असताना आता त्यातल्या एका सीनमुळे ती अडचणीत सापडली आहे. त्या सिनची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

तांडव वेबसिरीजमध्ये सैफ अली खान मुख्य भूमिकेत आहे. तांडव ही वेबसिरीज अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेली आहे. काही लोकांनी या वेबसिरीजवर हिंदू देवदेवतांचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अभिनेता मोहम्मद जीशान अयूब हा भगवान शंकराच्या वेषात दिसत आहे. त्या सिनमध्ये भगवान श्री राम व शिव शंकरावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या गोष्टीवरुन चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. विशेषत: हिंदू संघटनां या वेबसिरीजवर भडकल्या असून तांडवच्या मेकर्सनी माफी मागावी असे सांगितले आहे.  ही क्लिप जोरदार वायरल होतेय. सिरीज मेकर्सबरोबरच जीशान अयूब यांनाही ट्रेल केलं जातय.

आपली प्रतिक्रिया द्या