साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 17 ऑगस्ट 2025 ते शनिवार 23 ऑगस्ट 2025

>> नीलिमा प्रधान

मेष – कामात प्रगती होईल

मेषेच्या सुखस्थानात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग, कोणतेही विधान करताना, थट्टा मस्करी करताना काळजी घ्या. वाद, तणाव होतील. महत्त्वाच्या कामात प्रगती होईल. नवीन परिचय झालेल्या व्यक्तीसमवेत कोणताही व्यवहार करण्याची घाई करू नका. नोकरीत यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

शुभ दि. 17, 19

वृषभ – प्रशंसनीय कार्य कराल

वृषभेच्या पराक्रमात शुक्र, चंद्र बुध लाभयोग. प्रत्येक दिवस यश, उत्साह व प्रसिद्धी देणारा. कठीण कामे करून घ्या. कला, क्रीडा, साहित्यात चमकाल. नोकरीत प्रशंसनीय कार्य कराल. धंद्यात वाढ होईल. नवे काम होईल. वसुली करा. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमचे मुद्दे महत्त्वाचे व उपयुक्त ठरतील. मैत्रीपूर्ण वातावरण वाढवा.

शुभ दि. 19, 20

मिथुन – वाहन जपून चालवा

मिथुनेच्या धनेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. आळस न करता तुमच्या क्षेत्रात प्रगतीचा नवा टप्पा गाठण्याचा प्रयत्न करा. नोकरीत बदल, बढती होईल. धंद्यात वाढ करून अधिक जम बसवा. वाहन जपून चालवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांचा पाठपुरावा करा. स्वतचे स्थान मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा.

शुभ दि. 19, 20

कर्क – तुमचा प्रभाव वाढेल

स्वराशीत शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. कठीण प्रसंगावर मात करून यश मिळवता येईल. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत वरिष्ठांना मदत केल्याने तुमचा प्रभाव वाढेल. धंद्यात स्वत लक्ष द्या. मोठा करार करताना काळजी घ्या. आत्मविश्वास, उत्साह वाढेल. घरातील व्यक्तीची नाराजी दूर करता येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात गैरसमज दूर करा.

शुभ दि. 17, 18

सिंह – वाद वाढवू नका

सिंहेच्या व्ययेषात शुक्र, चंद्र गुरू युती. बोलण्यात, वागण्यात सहज झालेली चूक सर्वांना नाराज करू शकते. कोणताही वाद वाढवू नका. खाण्यामध्ये हलगर्जीपणा नको. नोकरीत वरिष्ठांची मर्जी राहील. सहकारी निष्कारण स्पर्धा करतील. धंद्यात नुकसान, फसगत टाळा. दुर्लक्ष करू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकार उपयुक्त ठरत नाही.

शुभ दि. 17, 18

कन्या –कठोर बोलणे टाळा

कन्येच्या एकादशात शुक्र, बुध मंगळ लाभयोग. मोठेपणाच्या आहारी जाऊ नका. कठोर बोलणे टाळा. नोकरीमध्ये वरिष्ठांच्या विरोधात बोलू नका. धंद्यात चातुर्य वापरा. थोरामोठय़ांचा अनादर होईल असे कृत्य नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सहनशिलता ठेवा. कुणाचाही अवमान होऊ देऊ नका. स्वतची प्रतिष्ठा पणाला लावू नका.

शुभ दि. 19, 20

तूळ – रागावर नियंत्रण ठेवा

तुळेच्या दशमेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. सप्ताहाच्या सुरुवातीला तणाव, वाद होतील. सावध रहा. कोणतेही कठीण काम करून घ्या. थोरामोठय़ांचे साहाय्य लाभेल. रागाचा पारा वाढू देऊ नका. मोठे यश मिळवता येईल. नोकरीत वर्चस्व वाढेल. बदलीचा योग आहे. धंद्यात वाढ होईल. नवीन परिचयातून उत्साह वाढेल.

शुभ दि. 19, 20

वृश्चिक – वरिष्ठांना दुखवू नका

वृश्चिकेच्या भाग्येषात शुक्र, चंद्र बुध लाभयोग. रेंगाळलेली कामे करून घ्या. अहंकार, संताप न ठेवता प्रेमाने बोला. चातुर्य वापरा. नोकरीमध्ये कामाचा व्याप वाढेल. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात जम बसवा. नवीन काम मिळवता येईल. जुना अनुभव उपयोग पडेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोध पत्करून प्रगतीचा मार्ग गाठावा लागेल.

शुभ दि. 17, 18

धनु – व्यवहारात फसगत होईल

धनुच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. अचानक जवळच्या व्यक्ती विरोधात जातील. मानसिक, शारीरिक त्रास होईल. व्यवहारात फसगत झाल्याचे निदर्शनस येईल. नुकसान टाळा. नोकरीत प्रभाव जाणवेल. दगदग होईल. धंद्यात आळस नको, अहंकार नको. राजकीय, सामजिक क्षेत्रात कोणतेही भाष्य करताना विचार करा.

शुभ दि. 19, 20

मकर – चौफेर सावध रहा

मकरेच्या सप्तमेषात शुक्र, चंद्र बुध लाभयोग. कठीण वेळेस मदतीस येईल तोच खरा मित्र हे लक्षात ठेवा. मोठेपणाच्या नादात कुणालाही आणार द्याल व अडचणीत याल. नोकरी टिकवा. वरिष्ठांना दुखवू नका. धंद्यात नम्रता बाळगा. फायदा कमावा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुतचे कौतुक होईल. अमिष दाखवून काम करून घेतले जाईल.

शुभ दि. 17, 21

कुंभ – व्यवहार तपासून पहा

कुंभेच्या षष्ठेशात शुक्र, सूर्य चंद्र लाभयोग. तुम्हाला मोठेपणा देऊन विरोधकांना गप्प बसवण्याचे काम दिले जाईल, सावध रहा. कोणताही व्यवहार तपासून पहा. नवीन ओळखीवर विश्वास ठेवू नका. नोकरीत दगदग जाणवेल. धंद्यात नुकसान टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अहंकारयुक्त भाष्य नको. थट्टा, मस्करी जपून करा.

शुभ दि. 19, 20

मीन – अनाठायी खर्च होतील

मीनेच्या पंचमेषात शुक्र, चंद्र बुध लाभयोग. घरातील वृद्धा व्यक्तीची काळजी घ्या. कायद्याला धरूनच कामे करा. थोरामोठय़ांचा अवमान करू नका. अनाठायी खर्च होतील. नोकरीत दगदग होईल. धंद्यात वाढ होईल. गुंतवणूक काळजीपूर्वक करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात चर्चेत, भेटीत यश मिळेल. सौम्य भाषेत बोला. कुठेही अट्टहास करू नका.

शुभ दि. 17, 21