
>> नीलिमा प्रधान
मेष – दुखापत टाळा
तुळेत शुक्र राश्यांतर, चंद्र मंगळ त्रिकोणयोग. जवळच्या व्यक्ती मदत करतील. प्रवासात कामे करताना सावध रहा. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. नविन परिचय होतील. कठोर शब्द नको. शुभ दिनांक 6, 7
वृषभ – समस्या सोडवाल
तुळेत शुक्र राश्यांतर, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. भावनेच्या आहारी न जाता चातुर्याने निर्णय घ्या. घरातील ज्येष्ठ व्यक्तींना दुखवू नका. समस्या सोडवण्यात यश मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावधपणे निर्णय घ्या. शुभ दिनांक 2, 3
मिथुन – जपून भाष्य करा
तुळेत शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. क्षुल्लक वाद, तणाव होईल. तारतम्य ठेवा. कठीण कामे करून घ्या. नोकरीत वर्चस्व लाभेल. विरोधकांना कमी लेखू नका. जपून भाष्य करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उत्साही वातावरण राहील. शुभ दिनांक 3, 4
कर्क – अहंकार दूर ठेवा
तुळेत शुक्र राश्यांतर, चंद्र, बुध त्रिकोणयोग. रेंगाळलेली कामे करून घ्या. अहंकार दूर ठेवा. नोकरीत कामे वाढतील. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संधी लाभेल. अडचणी आल्या तरी विचलित होउढ नका. शुभ दिनांक 3, 7
सिंह – प्रवासात सावध रहा
तुळेत शुक्र राश्यांतर, चंद्र, मंगळ प्रतियुती. क्षुल्लक कारणाने वाद, तणाव वाढतील. प्रवासात सावध रहा. फसगत होऊ देऊ नका. नोकरीत व्याप वाढतील. प्रसंगावधान ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात उतावळेपणा नको. शुभ दिनांक 6, 7
कन्या – प्रगतीची संधी लाभेल
तुळेत शुक्र राश्यांतर, चंद्र, गुरू त्रिुकोणयोग. उत्सह, आत्मविश्वास वाढेल. वर्चस्व प्रस्थापित होईल. प्रगतीची संधी लाभेल. नोकरीत मनाप्रमाणे बदल घडेल. परदेशी जाण्याचा योग. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मुद्दे पटतील. शुभ दिनांक 3, 7
तूळ – अनाठायी खर्च होईल
स्वराशीत शुक्र राश्यांतर, चंद्र गुरू त्रिकोणयोग. अडचणींतून मार्ग काढता येईल. वादाला महत्त्व देऊ नका. अनाठायी खर्च होईल. नोकरीत व्याप वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात महत्त्व वाढेल. योजना पुढे नेता येतील. शुभ दिनांक 4, 5
वृश्चिक – चातुर्याने निर्णय घ्या
तुळेत शुक्र राश्यांतर, चंद्र गुरू त्रिकोणयोग. परस्पर विरोधी घटना घडतील. क्षुल्लक वाद नको. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. चातुर्य वापरा. नात्यात गैरसमज होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांपासून सावध रहा. शुभ दिनांक 3, 7
धनु – रागावर ताबा ठेवा
धनुच्या एकादशात शुक्र, चंद्र शुक्र प्रतियुती. कोणतेही महत्त्वाचे काम सुरळीत पूर्ण होईल या भ्रमात राहू नका. रागावर नियंत्रण ठेवा. कुणालाही कमी लेखू नका. नोकरीत इतरांना मदत करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जपून रहा. शुभ दिनांक 3, 4
मकर – नोकरीत लाभ होईल
मकरेच्या दशमात शुक्र, चंद्र बुध त्रिकोणयोग. महत्त्वाची भूमिका निभवावी लागेल. भावना व कर्तव्य यांचा योग्य मेळ घाला. नोकरीत लाभ होईल. धंद्यातील गुंता कमी करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात यश मिळेल. शुभ दिनांक 3, 4
कुंभ – यश खेचावे लागेल
कुंभेच्या भाग्येषात शुक्र, चंद्र बुध त्रिकोणयोग. कठीण प्रसंगावर मात करून यश खेचावे लागेल. शत्रू-मित्र ओळखणे सोपे नाही. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात सावधपणे निर्णय घ्या. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव वाढेल. शुभ दिनांक 3, 4
मीन – उतावळेपणा नको
तुला राशीत शुक्र, चंद्र, गुरू त्रिकोणयोग. कोणताही प्रश्न सोडवताना उतावळेपणा नको. प्रकृतीची काळजी घ्या. महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. वरिष्ठांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा सांभाळा. मोह नको. शुभ दिनांक 4, 7




























































