
नीलिमा प्रधान
मेष – रागावर नियंत्रण ठेवा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. गौरी पूजनाच्या दिवशी मन अस्वस्थ होईल. सहनशीलता ठेवा. रागावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वरिष्ठांची राखावी लागेल. धंद्यात कुशलता लालसा, वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मान, प्रतिष्ठा मिळाली तरी, आत्मियता कमी जाणवेल. जवळच्या व्यक्ती गैरसमज करून देतील.
शुभ दि. 2, 6
वृषभ – अहंकार दूर ठेवा
चंद्र शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. गौरी विसर्जनाच्या दिवशी संयम ठेवा. धोका पत्करू नका. अहंकाराने समस्या वाढेल. गौरीपूजन, श्री गणेश विसर्जन नियमानुसार कराल. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. कामाचे कौतुक होईल. धंद्यात लाभ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या यशाचे कौतुक होईल.
शुभ दि. 31, 4
मिथुन – तुमचे महत्त्व वाढेल
सूर्य, चंद्र त्रिकोण योग, चंद्र, शुक्र प्रतियुती. अडचणी येतील परंतु त्यावर कुशलतेने मात करता येईल. चातुर्य वापरा. तुमचे महत्त्व सर्वत्र वाढेल. नोकरीत व्याप असला तरी यश खेचून आणाल. धंद्यात दगदग होईल. वसुली करा. प्रवासात घाई करू नका. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात पद, प्रतिष्ठा वाढेल.
शुभ दि. 2, 3
कर्क – तडजोड करा
बुध, प्लुटो षडाष्टक योग, चंद्र, मंगळ त्रिकोण योग. गोड बोलून काम पूर्ण करण्याकडे लक्ष ठेवा. कुठेही अहंकाराचे प्रदर्शन करू नका. यशात अडचणी वाढणार नाहीत. नोकरीत तत्परता, तडजोड करा. धंद्यात लाभ, धावपळ होईल. खंबीर रहा पण तणाव वाढू देऊ नका. पूजन, विसर्जन यात मनोभावे लीन व्हा म्हणजे मन अस्थिर होणार नाही.
शुभ दि. 31, 4
सिंह – मन शांत ठेवा
चंद्र, गुरू प्रतियुती, बुध शनि षडाष्टक योग. मन अस्थिर झाल्याने बोलण्यात, वागण्यात चूक होते. सावध रहा. गैरसमज, तणाव होऊ देऊ नका. पूजन, विसर्जनावेळी मन शांत ठेवा. नोकरीत नम्रता ठेवा. मैत्रीत दुरावा जाणवेल. धंद्यात नुकसान टाळा. वाद नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रभाव राहील. कुणाबद्दल मत व्यक्त करताना शब्द जपून वापरा.
शुभ दि. 2, 3
कन्या – वाद वाढवू नका
चंद्र, शुक्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. प्रत्येक दिवस आत्मविश्वासाचा, उत्साहाचा ठरेल. गौरी गणपती सण मनोभावे साजरा कराल. कुठेही अहंकाराची भाषा वापरू नका. रागावर ताबा ठेवा. कोणताही वाद वाढवू नका. कायदा पाळा. नोकरीत वरिष्ठांच्या कामात मदत करावी लागेल. धंद्यात लाभ होईल. समस्या वाढवू नका.
शुभ दि. 31, 1
तूळ – उतावळेपणा नको
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. गौरीपूजन, गणेश उत्सव आनंदात, उत्साहात साजरा कराल. क्षुल्लक कारणाने तणाव होईल. दुखापत टाळा. सावध रहा. नोकरीत वर्चस्व वाढेल. नवा बदल करण्याची संधी मिळेल. धंद्यात जम बसेल. कठोर शब्द वापरू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद लाभेल.
शुभ दि. 31, 1
वृश्चिक – गुंतवणूक वाढेल
चंद्र, बुध त्रिकोणयोग, चंद्र शनि लाभयोग. अडचणीतून मार्ग शोधता येईल. न झेपणारे काम गौरीगणेशाच्या कृपेने होण्याचे चिन्ह दिसेल. प्रत्येक दिवस आत्मविश्वास वाढवणारा आहे. नोकरीत जम बसेल. लाभ होईल. धंद्याला कलाटणी मिळेल. गुंतवणूक वाढेल. कर्जाचे काम होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कठीण कामे करून दाखवाल.
शुभ दि. 1, 2
धनु – धंद्यात फसगत टाळा
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र गुरू प्रतियुती. सप्ताहाच्या सुरूवातीला क्षुल्लक तणव जाणवेल. गैरसमज वाढतील. नम्रता ठेवा. गोड बोलण्यावर भाळू नका. फसगत होईल. नोकरीत प्रभाव वाढेल. कठीण काम करून द्याल. धंद्यात फसगत टाळा. नवे काम मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा, पद मिळेल. तणाव वाढवू नका.
शुभ दि. 4, 5
मकर – कराराची घाई नको
सूर्य, चंद्र षडाष्टक योग, चंद्र, गुरू प्रतियुती. कोणतेही क्षेत्र असो भाष्य करताना सावध रहा. कायदा पाळा. अहंकार ठेऊ नका. आरोप सहन करावा लागेल. नोकरी टिकवा. धंद्यात कायद्याला घरून व्यवहार करा. कराराची घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कोणताही मुद्दा मांडण्याचा उतावळेपणा नको. थट्टा-मस्करी करताना काळवेळाचे भान ठेवा.
शुभ दि. 31, 6
कुंभ – चांगली घटना घडेल
सूर्य, चंद्र त्रिकोणयोग, चंद्र, गुरू प्रतियुती. गौरी गणेश उत्साहात मनोभावे साजरा कराल. त्यांच्या आशीर्वादाने चांगली घटना घडेल. मैत्रीत, नात्यात तणाव जाणवेल. खाण्याची काळजी घ्याल. नोकरीत चमकाल. सहकारी गुप्त कारस्थाने करतील. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. वरिष्ठांना कमी लेखू नका.
शुभ दि. 31, 1
मीन – कायदा पाळा
सूर्य, चंद्र षडाष्टक योग. चंद्र, शुक्र प्रतियुती. तुमचा उत्साह, आत्मविश्वास वाढवणारी घटना घडेल. गौरी गणपतीच्या मनोभावे पूजनाने प्रेरणादायक घटना घडेल. क्षेत्र कोणतेही असो अहंकारी भाषा, संताप, अधिकार याचा वापर करू नका. कायदा सर्वत्र पाळा. धंद्यात वाद नको. दुखापत टाळा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात संयमी भूमिका घ्या.
शुभ दि. 31, 4