साप्ताहिक राशीभविष्य – रविवार 28 मे ते शनिवार 3 जून 2023

>> नीलिमा प्रधान

मेष – नवी संधी मिळेल
मेषेच्या सुखेषात शुक्र, चंद्र, गुरू प्रतियुती. वादविवादाचे प्रसंग येत राहील. संयम, दूरदृष्टिकोन ठेवा. नोकरीधंद्यात सुधारणा होईल. नवी संधी मिळेल. कर्जाचे काम करा. थोरामोठय़ांचे सहकार्य मिळेल. विरोधकांना कमी लेखू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात धावपळ होईल. सहनशीलता ठेवा.प्रतिष्ठा वाढेल. शुभ दिनांक : 28, 1

वृषभ – तणाव कमी होईल
वृषभेच्या पराक्रमात शुक, शुक्र नेपच्युन त्रिकोणयोग. करार करताना सावध रहा. नोकरीतील तणाव कमी होईल. धंद्यात गोड बोला. वसुली कराल. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील समस्या कमी होतील. वरिष्ठ, सहकारी यांच्याशी संवाद साधता येईल. किरकोळ अडचणींवर मात करावी लागेल. योग्य सल्ला घ्या. शुभ दिनांक: 28, 29

मिथुन – कायदा पाळा
मिथुनेच्या धनेषात शुक्र, चंद्र, गुरू प्रतियुती. आवेशाच्या भरात नम्रता सोडू नका म्हणजे अपमान टळेल. नोकरीच्या कामात कायदा पाळा. धंद्यात वाढ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वरिष्ठांची नाराजी होईल. भूमिका मांडताना उतावळेपणा नको. प्रेमाने मुद्दे मांडा. अट्टहास करू नका. प्रतिष्ठा जपा. शुभ दिनांक: 28, 1

कर्क – प्रेमाने प्रश्न सोडवा
स्वराशीत शुक्र, मंगळ शनि षडाष्टक. जमिन, घर, दुकान संबंधी वाद वाढू न देता प्रेमाने प्रश्न सोडवा. राग कमी करा. शत्रुत्व वाढवू नका. प्रत्येक दिवस यशदायी ठरेल. नोकरीधंद्यात चांगला बदल शक्य आहे. स्पर्धेत जिद्द ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात शत्रू, मित्र यांची सरमिसळ होईल. कोर्ट केस संपवा. शुभ दिनांक : 31, 1

सिंह – सावध रहा
सिंहेच्या व्ययेषात शुक्र, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. सहनशीलता, चातुर्य ठेवल्यास यश लांब नाही. प्रकृतीची काळजी घ्या. सावध रहा. नोकरीत वर्चस्व राहील. मैत्रीत, नात्यात क्षुल्लक गैरसमज होतील. धंद्यात उधारी नको. दूरदृष्टिकोन ठेवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रगतीचा नवा मार्ग शोधाल. शुभ दिनांक : 28, 29

कन्या – नोकरीत प्रभाव राहील
कन्येच्या एकादशात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. तुमच्या हुशारीचे कौतुक होईल अशी अपेक्षा करू नका. नोकरीत प्रभाव राहील. धंद्यात हिशेब, व्यवहार तपासून पहा. फायद्याची मोठी संधी मिळेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात योजनांना मदत मागताना वरिष्ठांसमवेत नम्रता ठेवा. कठोर शब्द नको. कायदा मोडू नका. शुभ दिनांक : 31, 1

तूळ – वरिष्ठांशी वाद नको
तुळेच्या दशमेषात शुक्र, सूर्य चंद्र षडाष्टक योग. आठवडय़ाच्या सुरूवातीला आरोप होतील. कामात चुका होतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांशी वाद नको. धंद्यात नम्रता ठेवा. लाभ होईल. वसुली करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमची लोकप्रियता पाहून विरोधक काडय़ा घालतील. कायदा पाळा. शुभ दिनांक : 28, 3

वृश्चिक – कठोर बोलणे टाळा
वृश्चिकेच्या भाग्येषात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. महत्त्वाची कठीण कामे करून घ्या. कठोर बोलणे टाळा. जबाबदारी स्वीकारावी लागेल. नोकरीत नम्रता ठेवा. धंद्यात गोड बोला. सावध रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कायद्याच्या कक्षेत राहून मुद्दे मांडा. परिचय उत्साहवर्धक ठरेल. मानसन्मान मिळेल. शुभ दिनांक : 28, 3

धनु – रागावर ताबा ठेवा
धनुच्या अष्टमेषात शुक्र, सूर्य, चंद्र षडाष्टक योग. शारीरिक, मानसिक तणाव निर्माण होईल. रागावर ताबा ठेवा. प्रवासात, घरात धाडसी निर्णय नको. प्रकृतीची काळजी घ्या. नोकरीत तणाव येईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात मनावर दडपण येईल. विचारांचा कोंडमारा होईल. कुटुंबात अस्थिरता वाढेल. शुभ दिनांक : 28, 29

मकर – कार्याचे कौतुक होईल
मकरेच्या सप्तमेषात शुक्र, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग. कल्पनाशक्तीला चालना मिळेल. मैत्री करणारे लोक वाढतील. नोकरीची संधी मिळेल. धंद्यात सावध रहा. घाई नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुमच्या कार्याचे कौतुक होईल. विरोधात गेलेले लोक परत येतील. तुम्ही कामाची व्याप्ती वाढवत रहा. मोठे यश प्राप्त होईल. शुभ दिनांक : 1, 2

कुंभ – प्रसंगावधान ठेवा
कुंभेच्या षष्ठेशात शुक्र, मंगळ शनि षडाष्टक योग. प्रसंगावधान ठेवा. रागावर ताबा ठेवा. कायदा पाळा. नोकरीच्या कामात दुसऱयावर अवलंबून राहू नका. धंद्यात वाढ होईल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात विरोधकांना कमी लेखू नका. बुद्धिचातुर्याने संभाषण करा. नवीन परिचयावर भाळू नका. स्पर्धेत मनस्ताप होईल. शुभ दिनांक : 1, 2

मीन – क्षुल्लक वाद होतील
मीनेच्या पंचमेषात शुक्र, सूर्य चंद्र त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर गैरसमज, क्षुल्लक वाद होतील. नोकरीत मनाप्रमाणे बदल शक्य. धंद्यात जम बसेल. कर्जाचे काम करा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात भाषण प्रभावी ठरेल. अधिकारात वाढ होईल. जनतेला दिलेला शब्द पाळता येईल. यश मिळेल. शुभ दिनांक : 30, 3