
निवडणूक आयोगाने सोमवारी पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी (SIR) अंतर्गत तयार केलेल्या मतदार यादीच्या प्रारूपातून वगळलेल्या मतदारांची यादी प्रकाशित केली आहे. ‘टीव्ही९ भारतवर्ष’ने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, वगळण्यात आलेल्या नावांमध्ये अशा लोकांचा समावेश आहे. जे स्थलांतरित झाले आहेत, मृत घोषित करण्यात आले आहेत किंवा ज्यांची पात्रता पुष्टी होऊ शकली नाही. पारदर्शकता आणि निष्पक्षता सुनिश्चित करण्यासाठी ही प्रक्रिया केली जात असल्याचे आयोगाने म्हटले आहे.
निवडणूक अयियोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मसुदा यादीतून एकूण ५,८२०,८९८ नावे वगळण्यात आली आहेत. त्यापैकी २,४१६,८५२ जण मृत आढळले, तर १,९८८,०७६ जण स्थलांतरित झाले. शिवाय १,२२०,०३८ लोक बेपत्ता आढळले. १,३८,३२८ नावे दुबार असल्याचे आढळले आणि ५७,६०४ इतर श्रेणीत आढळले.


























































