
ऐन कामाला जाण्याच्या वेळी पश्चिम रेल्वे खोळंबली आहे. भाईंदरजवळ तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहेत. हा तांत्रिक बिघाड दुरुस्त झाला आहे, पण लोकल पुर्वपदावर येण्यासाठी थोडा वेळ लागेल अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. पण सकाळी कामाला जाण्याचा वेळीच लोकल उशिरा असल्याने चाकरमान्यांचे हाल झाले आहेत.