पश्चिम रेल्वेवर 1 फेब्रुवारीपासून चार अतिरिक्त लोकल फेऱ्या; प्रवाशांना गर्दीपासून दिलासा मिळणार

Western Railway to Start 4 New Local Train Services from February 1

पश्चिम रेल्वे मार्गावर 1 फेब्रुवारीपासून चार अतिरिक्त लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून पश्चिम रेल्वे प्रशासनाने 12 डब्यांच्या चार नॉन-एसी लोकलची सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावरील लोकल फेऱ्यांची संख्या 1406 वरून 1410 पर्यंत वाढणार आहे. त्यामुळे प्रवाशांना लोकलमधील गर्दीपासून काही प्रमाणात दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पश्चिम रेल्वेमार्गावरील लोकल प्रवास सुकर करण्यासाठी प्रशासनाने कांदिवली-बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले होते. ते काम पूर्ण झाल्यामुळे अतिरिक्त लोकल फेऱ्या शक्य होत असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी सांगितले. सहावी मार्गिका प्रवासी वाहतुकीसाठी खुली केल्यामुळे बोरिवली आणि वांद्रे टर्मिनसदरम्यान सर्व लांब पल्ल्याच्या गाड्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर वळवण्यात आल्या आहेत. त्यामुळे लोकलसेवेची ऑपरेशनल कार्यक्षमता सुधारल्याचे अभिषेक यांनी स्पष्ट केले.

अप-डाऊन दिशेने प्रत्येकी दोन फेऱ्या

अप आणि डाऊन दिशेने धिम्या मार्गावर प्रत्येकी दोन फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. अप मार्गावर सकाळी 11 वाजून 39 मिनिटांनी भाईंदर येथून वांद्रेला जाणारी लोकल सुटेल. त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजून 14 मिनिटांनी दुसरी लोकल भाईंदर ते चर्चगेट अशी धावेल. तसेच डाऊन मार्गावर वांद्रे ते भाईंदरदरम्यान फेऱ्या चालवण्यात येतील. त्या फेऱ्या वांद्रे येथून पहाटे 4 वाजून 30 मिनिटांनी आणि दुपारी 1 वाजून 21 मिनिटांनी सुटतील.

Western Railway to Start 4 New Local Train Services from February 1

Relief for Mumbai commuters! Western Railway adds 4 additional non-AC local train services from Feb 1, increasing the total count to 1410. Check the timetable here.