पश्चिम रेल्वे बिफोर टाइम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाकाय लोअर परळ पुलाची पाडकाम मोहीम रविवारी सकाळी वेळेआधीच फत्ते झाल्याने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला. पश्चिम रेल्वेने पुलाचा सांगाडा काढण्यासाठी शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून सकाळी 9 वाजेपर्यंत महामेगाब्लॉक घेतल्याने चर्चगेटपासून दादरपर्यंतची सर्व रेल्वेवाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत कसेबसे घरी पोहचलेल्या मुंबईकरांना रविवारी सकाळचे काय, असा प्रश्न सतावत होता. मात्र रेल्वेने ठरलेल्या वेळेआधीच दीड तास मोहीम पूर्ण केल्याने पावणेआठच्या सुमारास वाहतूक सुरू झाली.

दरम्यान, या महामेगाब्लॉकमुळे दोनशे लोकल रद्द कराव्या लागल्या. ही पाडकाम मोहीम यशस्वी करण्यासाठी शेकडो रेल्वे कर्मचाऱयांबरोबरच पाच महाकाय क्रेनची मदत घेण्यात आली होती.