
दापोली येथील सीमाशुल्क (कस्टम्स) विभागाने शुक्रवारी दापोली बस स्थानकामागे एका कारमधून कोटय़वधी रुपयांची सुमारे 4 किलो 833 ग्रॅम व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी 4 जणांना अटक केली असून यात एका पोलीस कर्मचाऱयाचाही समावेश आहे.
शुक्रवारी व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी काही जण आले असल्याची माहिती कस्टम्स विभागाच्या अधिकाऱयांना मिळाली. त्यांनी संशयित गाडीचा पाठलाग करून ती दापोली बस स्थानकामागे थांबवली. या वाहनाची झडती घेतली असता त्यांना त्या वाहनात व्हेल माशाची उलटी आढळली.