
काही वेळा नोकरीसाठीचे कॉल लेटर उशिरा मिळते. अशा वेळी काय करावे, हे सूचत नाही. जर कॉल लेटर उशिरा हातात पडले तर काय करावे, हे जाणून घ्या.
– सर्वात आधी तुम्ही जर पोस्टाने किंवा ई-मेलने कॉल लेटरची वाट पाहत असाल तर ते उशिरा का आले, हे तपासून घ्या. नेमके काय चुकले हे जाणून घ्या.
– जर पोस्टातील अडचणींमुळे किंवा ई-मेलमधील काही समस्यांमुळे लेटर उशिरा आले तर संबंधित संस्थेशी संपर्क साधा. त्यांना सविस्तर सांगा. ते काय सांगतात हे नीट ऐकून घ्या.
– जर मुलाखतीसाठी उशीर झाला असेल तर तुम्ही मुलाखत पुढे ढकलण्याची विनंती करा. आपली सविस्तर माहिती सांगा. मुलाखतीसाठी तयार असल्याचे संबंधितांना कळवा.
– जर उशीर झाल्यामुळे नोकरीची संधी गमवावी लागत असेल तर निराश होऊ नका. भविष्यात चांगल्या संधीसाठी आणखी प्रयत्न करा. तुम्हाला यश नक्की मिळेल.