
मुंबई, पुण्यासह अनेक शहरात ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून खरेदी करणाऱया ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. लोक मोबाईलवरूनच खरेदी करत आहेत.
बऱ्याचदा ऑनलाईन खरेदी केल्यानंतर ऑर्डर केलेल्या पार्सलचे बॉक्स उघडल्यानंतर कळते की हे दुसरे पार्सल आहे. अशावेळी काय करावे हे कळत नाही.
जर तुमच्या बाबतीत असे कधी घडले तर घाबरून जाऊ नका. तात्काळ विक्रेत्याशी संपर्क साधा. योग्य वस्तू किंवा पैसे परत करण्याची त्यांना विनंती करा.
जर विक्रेत्याने तुमचे म्हणणे ऐकले नाही आणि त्याने वस्तू बदलून दिली नाही किंवा पैसे परत करण्यास नकरा दिला तर ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत तक्रार करा.
तक्रार करण्यासाठी ऑर्डरची डिटेल्स, पेमेंट केल्याची माहिती आणि विक्रेत्यासोबत झालेल्या संवादाचे पुरावे जपून ठेवा. हे सर्व ग्राहक न्यायालयात दाखवा.