
– आधार आणि पॅन लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने 31 डिसेंबरची मुदत दिली आहे. अनेकांनी अजूनही ते केलेले नाही. आधार आणि पॅन लिंक कसे करावे, हे जाणून घेऊ या.
– आधार-पॅन लिंक न केल्यास आयटीआर परतावा, बँक खाते उघडण्यावर निर्बंध येतील. एका आर्थिक वर्षात 2.5 लाखांपेक्षा जास्त रक्कम भरता येणार नाही.
– आयकर खात्याच्या टॅक्स ई-फायलिंग वेबसाईटवर जावे. तेथे आधार लिंक या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर आधार आणि पॅन क्रमांक टाका.
– आधारशी लिंक मोबाईल क्रमांक टाका. तुम्हाला आधार तपशील सत्यापन करण्यास सहमती देणारा पर्याय समोर दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर पॅन -आधार लिंक होईल.
– आधारसोबत लिंक असलेल्या मोबाईलवरून यूआयडीपीएएन <12 अंकी आधार > <10 अंकी पॅन > भरून 567678 किंवा 56161 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा.





























































