
अनेक मुलांना शाळेत जायचा कंटाळा येतो. सकाळी लवकर शाळा असेल तर ती झोपेतून उठत नाहीत. शाळेत जाण्याआधी रडत असतात.
छोटे मूलसुद्धा शाळेत जायला कंटाळा करत असेल तर सर्वात आधी त्याच्या भावना समजून घ्या. त्याच्याशी मनमोकळा संवाद साधा. त्याला काय त्रासदायक वाटते ते समजून घ्या.
मुलावर अभ्यासासाठी जास्त दबाव टाकू नका. त्याला खेळण्यासाठी पुरेसा वेळ द्या. त्याची इतर मुलांशी तुलना करू नका. शाळेत नेमकी कोणती समस्या आहे, ते त्याला विचारा.
जर मुलाला एखाद्या विषयामध्ये जास्त कंटाळा येत असेल तर त्याला शैक्षणिक मदत करा. त्याला आवडत असलेला अभ्यासक्रम शोधण्यासाठी प्रयत्न करा.
शाळेत जाऊन शिक्षकांशी चर्चा करा. त्यांचे मार्गदर्शन घ्या. मुलाला मानसिक आधार द्या. मानसिक विश्रांतीसाठी त्याला पुरेसा वेळ द्या. त्याच्यावर जास्त ओरडू नका.