पासपोर्टसाठी पोलीस व्हेरिफिकेशन झाले नाही… असं झालं तर…

पासपोर्ट पोलीस व्हेरिफिकेशन झाले नसेल तर, घाबरून न जाता  ‘पासपोर्ट सेवा’ संकेतस्थळावर तुमच्या अर्जाची स्थिती तपासा. त्यावरून तुम्हाला अर्जाचे स्टेटस समजेल.

जर काही दिवस उलटून गेले असतील तर, तुमच्या अर्जावरील स्थानिक पोलीस स्टेशनला कागदपत्रांसह (आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा) स्वतः भेट द्या.

 जर तुम्ही दिलेल्या पत्त्यावर पोलीस भेट देऊन गेले असतील आणि तुम्ही घरी नसाल, तर पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुम्ही हजर असल्याचे कळवा.

जर खूप जास्त वेळ झाला असेल, तर तुम्ही 1800-258-1800 वर कॉल करून तक्रार करू शकता किंवा ‘पासपोर्ट सेवा’ संकेतस्थळावर तक्रार नोंदवू शकता.

जर स्टेटस ‘अंडर रिह्यू’ (पुनरावलोकनाखाली) दाखवत  असेल तर याचा अर्थ अर्ज पडताळणी प्रक्रियेत आहे. थोडी वाट पहा. पोलीस व्हेरिफिकेशन होईल.