असं झालं तर… घराच्या नोंदणीची कागदपत्रे गहाळ झाली…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

1 तुमच्या घराची नोंदणीची कागदपत्रे गहाळ झाली असतील, तर तुम्हाला डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यासाठी काही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. या प्रक्रियेला विलंब करू नये.

2 पोलीस ठाण्यात जाऊन हरवलेल्या कागदपत्रांची तक्रार दाखल करा. तुम्ही हरवलेल्या कागदपत्रांची माहिती आणि तपशील पोलिसांना द्या.

3 हरवलेल्या कागदपत्रांची माहिती आणि तुमचा संपर्प तपशील देऊन वृत्तपत्रांत जाहिरात द्या. कायदेशीर सल्लागार किंवा मालमत्ता तज्ञांशी संपर्प साधा.

4 घराची नोंदणी ज्या उपनिबंधक कार्यालयात झाली आहे, तिथे जाऊन डुप्लिकेट कागदपत्रांसाठी अर्ज करा. अर्जासोबत एफआयआरची प्रत, वृत्तपत्रातील जाहिरात, आवश्यक कागदपत्रे द्या

5 उपनिबंधक कार्यालयाकडून डुप्लिकेट कागदपत्रे मिळवण्यासाठी तुम्हाला काही शुल्क भरावे लागेल. या सर्व प्रक्रियेला उशीर करू नका.