
घरातील फ्रीज कधी कधी अचानक थंड होणे बंद करते. चार्ंजगला असूनही जर फ्रीज थंड होत नसेल तर काही गोष्टी तपासणे गरजेचे आहे.
फ्रीजच्या मागच्या बाजूला असलेल्या पंडेन्सर कॉइलची तपासणी करा. त्यावर धूळ किंवा कचरा साचलेला असू शकतो. कॉइलला ब्रशने स्वच्छ करा.
फ्रीज आणि फ्रीजमधील एअरव्हेंट्स तपासा. ते ब्लॉक झालेले असू शकतात. व्हेंट्समधून हवा सहजपणे फिरू शकते का, याची तपासणी करा.
फ्रीजचा कॉम्प्रेसर, फॅन किंवा अन्य भागात समस्या आलेली असू शकते. जर तुम्हाला यासंबंधी माहिती नसेल तर फ्रीज दुरुस्त करणाऱ्याला घरी बोलवावे.
कधी कधी फ्रीज थोडा वेळ बंद करून पुन्हा सुरू करून पाहा. फ्रीजमध्ये जास्त वस्तू असतील तर त्या काही कमी करून पहा. हे सर्व करताना फ्रीजचे बटन बंद करा.