असं झालं तर… भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असेल तर…

सध्या देशातील अनेक कानाकोपऱ्यात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. ते रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना चावा घेत आहेत. कुत्र्यांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

जर तुमच्या आजूबाजूच्या परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला असेल तर तुम्ही तत्काळ खबरदारी म्हणून स्थानिक प्राधिकरणाशी संपर्क साधायला हवा.

भटक्या कुत्र्यांसाठी रस्त्यांवर अन्न आणि मांसाचे तुकडे फेकू नका. यामुळे रस्त्यावर घाण पसरू शकते. परिसर स्वच्छ कसा ठेवता येईल, यासाठी प्रयत्न करा.

भटक्या कुत्र्यांना खायला घालण्यासाठी एक ठरावीक जागा निश्चित करा. त्याच ठिकाणी त्यांना अन्न द्या. त्यामुळे इतर ठिकाणे स्वच्छ राहतील.

त्या-त्या क्षेत्रातील नगरपालिकेशी किंवा महानगरपालिकेशी संपर्क साधता येईल. ते प्राणी कल्याण संस्थांच्या मदतीने कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण करतील.