
1 ड्रायव्हिंग लायसन्स हे आज महत्त्वाचे सरकारी ओळखपत्र बनले आहे. त्यात नोंदवण्यात आलेला मोबाईल नंबर बरोबर आणि सक्रिय असणे आवश्यक आहे.
2 त्यामुळे ड्रायव्हिंग लायसन्सचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या. मोबाईल नंबर ऑनलाईन पद्धतीने अपडेट करता येतो. ही प्रक्रिया अतिशय सोपी आहे.
3 यासाठी parivahan.gov.in या वेबसाईटवर जा. तेथे ड्रायव्हिंग लायसन्सशी संबंधित लिंकवर क्लिक करा. तेथे तुम्हाला अपडेट मोबाईल नंबर हा पर्याय दिसेल.
4 तेथे ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक, जन्मतारीख आणि मागितलेली उर्वरित माहिती भरा. त्यानंतर नवीन मोबाईल नंबर टाका. त्यावर ओटीपी येईल.
5 ओटीपी टाकल्यानंतर पडताळणी पूर्ण होईल. यानंतर आवश्यक शुल्क भरून विनंती सबमिट करा. काही दिवसांमध्ये मोबाईल नंबर अपडेट होतो.





























































