
– सध्या ऑनलाईन फ्रॉड मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. बँकेतून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट न केल्यास बँक खाते बंद केले जाईल, असे सांगितले जाते.
– जर तुम्हाला असा कॉल आला तर लगेच कॉल डिस्कनेक्ट करा. त्यांच्याशी बोलू नका किंवा कोणतेही बटन दाबू नका.
– कोणतीही बँक कधीही फोनवर ओटीपी, पिन, सीव्हीव्ही किंवा पासवर्ड विचारत नाही. केवायसी अपडेट करायची असेल तर थेट बँकेत जाऊन चौकशी करा.
– जर अनोळखी व्यक्तीने केवायसीबद्दल विचारणा केल्यास किंवा फसवणूक झाल्यास तत्काळ राष्ट्रीय सायबर क्राइम किंवा हेल्पलाइन नंबर 1930 वर तक्रार करा.
– फोनवर आलेल्या मेसेज किंवा ई-मेलमधील कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका. केवायसी ब्लॉक केली जाईल, असे सांगितले तरीही त्यांचे ऐकू नका.





























































