असं झालं तर… दिवाळीचा फराळ जास्त असेल तर…

  • दिवाळीच्या सणात फराळामध्ये करंजी, लाडू, शंकरपाळी, अनारसे, बेसन आणि रव्याचे लाडू, चकली, चिवडा खास बनवले जातात, परंतु कधी कधी हे जास्त प्रमाणात बनवले जाते.
  • दिवाळीच्या फराळामध्ये पदार्थ जास्त बनवण्यात आले असतील तर ते वाया जाऊ नये म्हणून काळजी घ्या. फराळ खराब होऊ नये यासाठी हवाबंद डब्यांचा वापर करा.
  • वेगवेगळ्या प्रकारचे फराळ एकत्र ठेवू नका. त्यामुळे एका पदार्थाचा वास दुसऱ्याला लागणार नाही आणि तो व्यवस्थित टिकेल. फराळ थंड आणि कोरड्या ठिकाणी ठेवा.
  • जास्त फराळ असल्यास वेळीच कुटुंबीय आणि मित्रांमध्ये वाटून द्या. यामुळे बनवलेला फराळ वाया जाणार नाही आणि इतरांनाही त्याचा आनंद घेता येईल.
  • फराळ पॅक करून भेटवस्तू म्हणून वाटू शकता, ज्यामुळे त्यांना फराळाचा आनंद घेता येईल. काही गरीब मुलांनाही फराळ वाटू शकतात. वृद्धाश्रम, संस्थांमध्येही फराळ देऊ शकता.