असं झालं तर… लोकल प्रवासात मोबाइल हरवला तर…

मुंबईसारख्या शहरात लोकलने प्रवास करणे प्रचंड जिकिरीचे काम आहे. लोकलला गर्दी असते. गर्दीतून प्रवास करताना अनेकदा खिशातील पाकीट, मोबाइल हरवले जातात.

लोकलने प्रवास करताना तुमचा मोबाइल हरवला असेल किंवा चोरीला गेला असेल तर सर्वात आधी पुढच्या स्टेशनवर उतरून रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) कडे तक्रार करा.

रेल मदत ऍप डाऊनलोड करून प्रवासात हरवलेल्या फोनची तक्रार नोंदवा. आरपीएफ या तक्रारीवर निश्चित कारवाई करून तुम्हाला हरवलेला मोबाइल देण्याचा प्रयत्न करेल.

तुमच्या मोबाइल सेवा प्रदात्याशी संपर्क साधा आणि सिमकार्ड ब्लॉक करा. यामुळे तुमच्या क्रमांकाचा गैरवापर होणार नाही आणि तुम्ही नवीन सिमकार्ड घेऊ शकता.

सीईआयर पोर्टलच्या ‘ब्लॉक/चोरलेला मोबाइल’ या पर्यायावर जाऊन तुमच्या मोबाइलचा आयएमईआय क्रमांक, आधार-लिंक्ड पत्ता आणि तक्रारीचे तपशील भरा.