असं झालं तर – मोबाईल सिमकार्ड हरवले तर…

जर तुमचे सिमकार्ड हरवले किंवा चोरीला गेले तर सर्वात आधी कंपनीच्या ग्राहक सेवा केंद्रावर संपर्क साधा. तसेच सिमकार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा. नव्या सिमकार्डसाठी अर्ज करा.

सिमकार्ड हरवल्यास ज्या कंपनीचे सिमकार्ड आहे, त्या कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन किंवा ग्राहक सेवेला पह्न करून सिमकार्ड ब्लॉक करू शकता.

सिमकार्ड ब्लॉक केल्यानंतर नवीन सिमकार्ड घेण्यासाठी कंपनीच्या जवळच्या शॉपमध्ये जा. आवश्यक कागदपत्रे आणि तुमचा पुरावा दाखवून नवीन सिमकार्डसाठी अर्ज करा.

सिमकार्ड हरवल्यास किंवा चोरीला गेल्यानंतर तुमचे बँक खाते आणि अन्य ऑनलाईन खाते तपासून पाहा. काही चुकीचे घडले नाही याची खात्री करा.

तुमच्या हरवलेल्या सिमकार्डबद्दल सोशल मीडियावर कोणतीही माहिती देऊ नका. नवीन सिमकार्डसाठी पैसे मोजावे लागत नाहीत. त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही.