बाईकचे ब्रेक फेल झाले तर? घाबरू नका, ‘हे’ करा

कधी कधी बाईकचे ब्रेक अचानक काम करायचे थांबतात तेव्हा बाईकस्वाराला बाईक थांबवणे कठीण होऊन जाते.

जर तुमच्या बाईकचे ब्रेक फेल झाले असे तुम्हाला वाटत असेल तर लगेच घाबरून जाऊ नका, शांत राहा.

सर्वात आधी गिअर खाली करा. इंजिन ब्रेकिंगचा वापर करून बाईकचा वेग कमी करण्याचा प्रयत्न करा.

अशा वेळी क्लच दाबू नका, वेग वाढेल. हळुवारपणे आणि टप्प्याटप्प्याने हँड ब्रेक वापरा अन् बाईक थांबवा.

काही दुर्घटना होणार नाही, याची दक्षता घ्या. तसेच गाडीच्या ब्रेकची नियमितपणे तपासणी करणे गरजेचे आहे.