
सोन्याचा भाव सवा लाखाच्या घरात गेला आहे. त्यामुळे सोन्याला सोन्याचे दिवस आले आहेत. अनेक शहरांत सोने चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. महिलांनी अलर्ट राहणे गरजेचे आहे.
रस्त्यावरून जाताना बाइकवरून आलेले चोर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. यासाठी महिलांनी स्वतःची आणि दागिन्यांची काळजी घ्यायला हवी.
जर बाइकवरून आलेल्या चोरांनी गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेले तर सर्वात आधी पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल करा. घडलेल्या सर्व घटनेची माहिती पोलिसांना द्या.
चोर कोणत्या दिशेने पळालेत. त्यांनी कोणती मोटरसायकल वापरली, ते कसे दिसत होते, हे सर्व पोलिसांना सांगा. चोरी झालेल्या परिसरात सीसीटीव्ही आहेत का ते तपासा.
चोरी झाल्यानंतर घाबरून जाऊ नका. शांतपणे सविस्तर माहिती पोलिसांना द्या. सीसीटीव्ही फुटेजद्वारे चोरांची ओळख पटवणे सोपे आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचे मंगळसूत्र मिळू शकते.




























































