कडधान्ये लवकर शिजवण्यासाठी

 हरभरा, मूग, उडीद, चवळी, वटाणा, मटकी यांसारखी कडधान्ये लवकर शिजवण्यासाठी प्रेशर कुकरमध्ये पाणी, चिमूटभर बेकिंग सोडा आणि थोडे मिठ घालून दोन ते तीन शिट्या होऊ द्या. शिजवण्यापूर्वी कडधान्ये रात्री भिजत ठेवा. यामुळे ती लवकर मऊ होतात.

 कडधान्ये स्वच्छ धुवा आणि मोड येण्यासाठी स्वच्छ भांडय़ात ठेवा. मोड आलेली कडधान्ये चिकट किंवा कुबट वास येऊ नये म्हणून त्यांना नीट निथळून घ्या. अधूनमधून पाणी बदला. शिजवताना थोडे तेल किंवा तूप घातल्यास साल फुटत नाही. गरम पाण्यात मीठ घातल्याने कडधान्ये चविष्ट होतात व लवकर शिजतात.