
साडी वर्षानुवर्षे नवीकोरी दिसावी यासाठी साडी नेहमी थंड किंवा कोमट पाण्यात धुवावी. गरम पाणी वापरल्यास तंतू सैल होतात आणि कापडाची चमक कमी होते. साडी धुण्यासाठी शक्यतो शाम्पू वापरा. एका बादली पाण्यात थोडासा माइल्ड शाम्पू घ्यायचा आणि साडी 10 मिनिटांसाठी त्यात भिजवून ठेवा. नंतर हलक्या हाताने धुवा.
हसाडी थेट उन्हात वाळवू नये. त्यामुळे रंग फिकट होतो. सावलीत वाळवा. वाळायला जास्त वेळ लागू द्या. हवेशीर ठिकाणी वाळत घातल्यामुळे साडीचा रंग टिकून राहतो. साडीवर थेट गरम इस्त्राr फिरवू नका. त्याऐवजी वर एक पातळ कापड ठेवून इस्त्राr करा, त्यामुळे साडीचा मऊपणा आणि चमक दोन्ही टिकून राहतात.