
आधार कार्ड घोटाळय़ाचा बळी पडण्यापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी वापरकर्त्याने त्याचे आधार कार्ड सुरक्षित ठेवले पाहिजे.
आधार कार्डचा कुणी गैरवापर करू नये म्हणून तुम्ही तुमचे आधार कार्ड नेहमी लॉक करणे केव्हाही चांगले आहे.
शक्यतो, नेहमी मास्क केलेले आधार कार्ड वापरा. मास्क आधार कार्डमध्ये आधार कार्डचा 12 अंकी क्रमांक दिसत नाही.
तुम्ही आधार कार्ड क्रमांकाऐवजी व्हर्च्युअल आयडी व्हीआयडी शेअर करू शकता. जेणेकरून आधार कार्ड क्रमांकाचा गैरवापर होणार नाही.
मास्क्ड आधार आणि व्हीआयडी जनरेट करण्यासाठी तुम्ही यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकता.