असं झालं तर… बँक खात्यात चुकून पैसे आले तर…

1 काही वेळा बँकेच्या तांत्रिक चुकीमुळे किंवा कर्मचाऱयांकडून चुकून तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले तर आनंदी होऊ नका.

2 बँक खात्यात दुसऱयांचे पैसे जमा झाले तर त्यावर हक्क सांगता येत नाही. बँकेचे काही नियम आहेत. ते तुम्हाला पाळणे आवश्यक आहे.

3 10 हजार असो की 10 लाख, पैसे जमा झाल्याचा मेसेज आल्यास तत्काळ जवळच्या बँक शाखेत जाऊन पैशांची माहिती द्या.

4 पैसे जमा झाले म्हणून लगेच खर्च करू नका. बँकेकडून तुमची सविस्तर चौकशी केली जाऊ शकते. तसेच कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.

5 बँक खात्यात चुकून जमा झालेले पैसे परत न केल्यास कलम 403 नुसार तुम्हाला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.