व्हॉटस्ऍपवर कॉल वेटिंग फिचर सुरू

तुमचा व्हॉटस्ऍप कॉल सुरू असेल आणि तुम्हाला दुसऱया कुणी फोन किंवा व्हॉटस्ऍप कॉल केला तर आपल्याला ते समजत नाही. त्यावर उपाय शोधत व्हॉटस्ऍपने कॉल वेटिंग फिचर आणले आहे. या फिचरमुळे कॉल आल्यावर माहिती मिळणार असून कॉल करणाऱयालाही बिझी टोन ऐकू येईल. यामध्ये युजरला कॉल होल्डवर ठेवता येणार नाही. मात्र युजर दुसरा कॉल रद्द करू शकतो किंवा पहिला कॉल बंद करून दुसऱया कॉलवर बोलू शकणार आहे. गेल्या महिन्यात व्हॉटस्ऍपने कॉल वेटिंग फिचर आयफोनसाठी दिले होते. आता ते ऍण्ड्राईडसाठीही देण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या