व्हॉट्सऍपने बंद केली 20 लाख युजर्सची खाती, आय.टी. नियम, प्लॅटफॉर्म सेवाशर्तींचा भंग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगातील सर्वाधिक लोकप्रिय मेसेजिंग अँप व्हॉट्सअॅपने ऑगस्ट महिन्यात माहिती तंत्रज्ञान नियम आणि प्लॅटफॉर्म सेवाशर्तीचा भंग करणाऱया हिंदुस्थानातील 20 लाख व्हॉट्सअॅप खातेदारांची खाती बंद केली आहेत. नियम मोडणाऱया युजर्सवरील या शिस्तभंगाच्या बडग्याची माहिती प्लॅटफॉर्मच्या मासिक का@म्प्लायन्स अहवालात देण्यात आली आहे.

याआधी प्लॅटफॉर्म्स संचालकांनी 46 दिवसांत 3 लाख नियमबाह्य संदेश पाठवणाऱया युजर्सची खाती बंद करण्याचा बडगा उचलला होता. 594 तक्रारींच्या आधारे ही कारवाई करण्यात आली होती. जगभरात व्हॉट्सअॅप प्रशासन दर महिन्याला बेशिस्त आणि नियम मोडणाऱया 80 लाख युजर्सची खाती बंद करते.

तक्रारींच्या आधारे खात्यांना लावली टाळी

प्लॅटफॉर्म संचालकांनी विविध तक्रारींची दखल घेत त्यांस अॅपच्या युजर्सवर खातेबंदीची कारवाई केली आहे. त्यात विना अनुमती बल्क मेसेज पाठवणाऱया 20 लाख 70 हजार युजर्सच्या खात्यांना टाळी ठोकण्यात आली आहेत. या कारवाईसाठी खाते स्पोर्टच्या 105, बंदी मागणीच्या 222, प्रॉडक्ट स्पोर्टच्या 42, सुरक्षेच्या 17 तर अन्य सपोर्टच्या 34 तक्रारी प्लॅटफॉर्मला मिळाल्या होत्या.

z व्हॉट्सअॅप प्लॅटफॉर्मचा दुरुपयोग रोखण्यासाठी बेशिस्त युजर्सवर कारवाई सुरूच ठेवणार. प्लॅटफॉर्मवर स्पॅम (खोटे) आणि नकोसे मेसेज टाकणाऱयांवर शिस्तीसाठी बडगा उचलणार
z धोकादायक आणि समाजविघातक संदेश पाठवणाऱया युजर्सवर आर्टिफिशल इंटेलिजन्सद्वारे लक्ष ठेवणार
z माहिती तंत्रज्ञान कायद्यातील नियमांची पायमल्ली करणाऱया युजर्सवर कारवाईची टांगती तलवार कायम