अँड्रॉईड यूझर्ससाठी व्हॉट्सअ‍ॅपने आणले नवीन फिचर, कसे वापरावे? वाचा.. 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

व्हॉट्सअ‍ॅपने अँड्रॉइड स्मार्टफोनसाठी ‘बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन’चे फीचर जारी केले आहे. यापूर्वी व्हॉट्सअ‍ॅपने हे फिचर iOS साठी दिले होते. ज्यात वापरकर्त्यांना फेस आयडीसह व्हॉट्सअ‍ॅप सुरक्षित करण्याचा पर्याय मिळतो. तसेच ज्या iPhone मध्ये टच आयडी आहे, त्यांना हे फिचर यापूर्वीच देण्यात आले आहे.

याबाबत माहिती देताना व्हॉट्सअ‍ॅपने म्हटले आहे की, ‘ज्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आले आहे, त्यामध्ये वापरकर्त्यांना फिंगरप्रिंट स्कॅनरद्वारे व्हॉट्सअ‍ॅप लॉक करण्याचे फिचर मिळेल. आपण आपल्या व्हॉट्सअ‍ॅपला उपडेट केल्यानंतर आपल्याला हे फिचर मिळेल.’

व्हॉट्सअ‍ॅप ने आपल्या अधिकृत ब्लॉगपोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने iPhone साठी टच आयडी आणि फेस आयडीला स्पोर्ट दिला होता. जेणेकरून वापरकर्त्यांना अतिरिक्त सुरक्षा मिळू शकेल. आता हेच फिचर अँड्रॉइड स्मार्टफोनसाठीही लॉन्च करण्यात येत आहे.’

अँड्रॉइड वापरकर्ते अशाप्रकारे सेट करू शकतात ‘फिंगरप्रिंट लॉक’ 

व्हॉट्सअ‍ॅप ओपन करून Settings वर टॅप करा, त्यानंतर Account सिलेक्ट करा. तुम्हाला त्यात Privacy ऑप्शनमध्ये Fingerprint लॉकचे ऑप्शन मिळेल. येथून आपण ते ऑन करून कन्फर्म करा. यानंतर यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ऑन करण्यासाठी फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन आवश्यक असेल.