‘व्हॉट्सऍप बिझनेस’ युजर्ससाठी नवे फीचर्स

हिंदुस्थानात ‘व्हॉट्सऍप बिझनेस’ वापरणाऱया युजर्ससाठी नवीन फीचर लाँच करीत असल्याची घोषणा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी बुधवारी केली. ‘व्हॉट्सऍप बिझनेस’ युजर्ससाठी पुढील तीन फीचर्स आणले जाणार आहेत.  व्हॉट्सऍप फ्लोज – व्यापाराला चॅट थ्रेडमध्ये अधिक कस्टमाईज्ड अनुभव मिळणार आहे.  पेमेंट मेथड – या माध्यमातून ग्राहक एखाद्या कंपनीच्या बिझनेस चॅट थ्रेडमधूनच सेवांसाठी पेमेंट करू शकणार आहेत.  मेटा व्हेरिफाईड – व्हॉट्सऍप बिझनेस युजर्सनाही मेटा व्हेरिफिकेशन मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत.