व्हॉट्सऍपला टक्कर देणार स्वदेशी ‘संदेश’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रायव्हसी पॉलिसीमुळे दिवसेंदिवस व्हाॅट्सऍपची लोकप्रियता कमी होत असून टेलिग्राम, सिग्नल सारख्या ऍपचा वापर वाढलाय. आता व्हाॅट्सऍपला टक्कर देण्यासाठी आणखी एक मॅसेजिंग ऍप दाखल होणार आहे. स्वदेशी बनावटीचे संदेश ऍप केंद्र सरकारतर्फे लवकरच लॉंच करण्यात येणार आहे. सध्या या ऍपची विविध स्तरावर चाचणी सुरू आहे. प्राथमिक स्तरावर हे ऍप सध्या सरकारी अधिकाऱयांच्या कापरात असून चाचणीचे विविध टप्पे पार केल्यानंतर ते सर्कांच्या सेवेत दाखल होणार आहे. या ऍपचे वैशिष्टय़ म्हणजे युजर्सच्या प्रायव्हसीची र्प्णूपणे काळजी घेतली जाणार आहे.

  • प्रायव्हसीसाठी या ऍपमध्ये साईन ईन करतेवेळी ओटीपीचा वापर करण्यात येणार आहे. या ऍपला गव्हरमेंट इन्स्टंट मॅसेजिंग सिस्टिम असेही नाव देण्यात आले आहे.
  • नॅशनल इन्फॉर्मेटिक सेन्सरकडून नियंत्रित केल्या जाणाऱया या ऍपमध्ये चॅटिंग मॅसेजिंगसह कॉईस कॉलिंग फिचरही देण्यात आले आहे.