WhatsApp OTP स्कॅम, नवीन पद्धतीने हॅक होत आहे अकाउंट; असे राहा सुरक्षित

गेल्या काही दिवसांपासून WhatsApp OTP स्कॅमच्या अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच WhatsApp द्वारे फसवणुकीचे अनेक प्रकार देखील समोर येत आहेत. हॅकर्स OTP च्या माध्यमातून WhatsApp हॅक करतात.

अशी केली जाते फसवणूक

हॅकर्स एका अनोळखी नंबरहुन WhtahsApp वर मेसेज करतात आणि आपण अडचणीत असल्याचं सांगतात. यानंतर हॅकर्स आपली अडचण सांगून भीतीचं वातावरण तयार करत वापरकर्त्याकडून ओटीपीची मागणी करतो आणि म्हणतो की चुकून ओटीपी त्यांच्या क्रमांकावर गेला आहे. जस तुम्ही त्याला आपला ओटीपी देता, तो तुमचं WhtahsApp अकाउंट ऍक्सेस करतो. असं झाल्यास हॅकर्स तुमच्या अकाउंटचा चुकीचा वापर ही करू शकतो.

फसवणुकीपासून वाचण्यासाठी करा हे उपाय

फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणालाही आपला ओटीपी शेअर करू नका. तसेच तुम्ही तुमचं अकाउंट Two Step verification द्वारे सुरक्षित करू शकता.

आपली प्रतिक्रिया द्या