व्हॉट्सअॅप होणार अधिक सुरक्षित, नवीन फिचरची चाचणी सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

जगातील सर्वाधिक लोकप्रिय मॅसेंजिंग अॅप व्हॉट्सअॅप आपल्या युझर्ससाठी नवनवीन बदल करत असते. गेल्या वर्षी व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी अनेक वैविध्यपूर्ण फिचर्स आणली होती, आणि आता 2019 मध्ये असेच एक नवे फिचर येणार आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअॅप पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित होणार आहे.

अॅड्रॉईड आणि आईओएस युझर्ससाठी व्हॉट्सअॅप फिंगरप्रींट ऑथेंटिकेशन फिचरचा पर्याय उपलब्ध करून देत आहे. याची सध्या चाचणीही सुरू आहे. या फिचरमुळे व्हॉट्सअॅपची सुरक्षितता आणि प्रायव्हसी वाढणार आहे. तसेच टच आयडी आणि फेस आयडीसारखे नवीन नवीन फिचर या वर्षी येणार आहे.

2018 मध्ये व्हॉट्सअॅपने युझर्ससाठी डिलीट बटन, ग्रुप कॉलिंग आणि स्टिकर्ससारखे फिचर आणले होते. यावर युझरने चांगल्या प्रतिक्रिया दिल्या होत्या.