व्हॉट्सअॅप वेब डाऊन, युजर्सकडून तक्रारींचा पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील अनेक भागांत शुक्रवारी सकाळी व्हॉट्सअॅप वेब व्हर्जनचा वापर करणाऱ्या युजर्सला अडचणींचा सामना करावा लागला. आज सकाळी 9 च्या सुमारास व्हॉट्सअॅप वेब अचानक डाऊन झाले. युजर्सला लॉग-इन करण्यास समस्या येत असल्याने अनेकांनी सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पाडला. काही वेळानंतर व्हॉट्सअॅपची सर्विस पुन्हा सुरू झाली. व्हॉट्सअॅपच्या वेब प्लॅटफॉर्मवर लॉगइन करण्यास समस्या येत होती.

मोबाईल अॅप सुरळीत सुरू होते. ऑनलाईन सर्विसवर नजर ठेवणारी वेबसाईट डाऊनडिटेक्टरवर करण्यात आलेल्या 64 टक्के व्हॉट्सअॅप वेब युजर्संनी आपल्या तक्रारी केल्या. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स आणि रेडिटवरसुद्धा काही युजर्सनी आपल्या समस्या मांडल्या. काही युजर्सचे मोबाईल आणि वेबदरम्यान मेसेज सिंक होत नव्हते.