
व्हॉट्सऍप नवीन वर्षात पहिले नवे फीचर घेऊन युजर्सला खूश करण्याच्या तयारीत आहे. आता मोबाईल क्रीनवर येणाऱया नोटिफिकेशनमध्ये मेसेज पाठविणाऱयाचा प्रोफाईल फोटो दिसणार आहे. नवीन व्हॉट्सऍप फीचर नोटिफिकेशनमध्ये प्रोफाईल फोटोला सपोर्ट करणार आहे.
इन्संट मॅसेजिंग ऍप व्हॉट्सऍपने या वर्षातली त्यांचे पहिले फीचर रोलआऊट केले आहे. त्याअंतर्गत सिस्टम नोटिफिकेशनमध्ये युजर आता सेंडरने पाठवलेल्या मॅसेजसोबत त्याचा प्रोफाईल फोटोही पाहू शकणार आहे. व्हॉट्सऍप प्रोफाईल फोटो युजरला त्याच्या नोटिफिकेशनमध्ये दिसेल. सध्या हे फीचर आयओएस यंत्रणेमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याची चाचणी सुरू असून अद्याप सर्व युजर त्याचा वापर करू शकत नाहीत.

























































