Beauty Tips – सणासमारंभासाठी चेहरा सुंदर दिसावा म्हणून ‘ही’ फळे आहेत अत्यंत उपयोगी, वाचा

आपल्या आहारामध्ये फळे ही फार महत्त्वाची भूमिका बजावतात. फळांमधून मिळणारी पोषक तत्वे आपल्या आरोग्यासाठी फार गरजेची मानली जातात. फळे ही आपल्या आरोग्याच्या दृष्टीने जितकी महत्त्वाची आहेत, तितकीच महत्त्वाची आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने देखील आहेत. आपण घरी असलेल्या फळांचा योग्य वापर केला तर, आपल्याही सौंदर्यात चांगलीच भर पडेल. फळे आरोग्यासाठी किती फायदेशीर असतात हे आपण सर्वच जाणतो, पण तुम्ही कधी विचार केला आहे का की ही फळे त्वचेचे सौंदर्य वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. आपण घरी असलेल्या कोणत्या फळांपासून फ्रूट फेशियल करु शकतो हे जाणून घेऊया.

घरी उपलब्ध असलेल्या फळांचा गर चेहऱ्यावर लावला तरी चेहऱ्यासाठी खूप फायदा होतो. फळांमध्ये असलेल्या पोषक घटकांमुळे आपल्या चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.

Skin Care- फक्त 5 स्टेप्समध्ये घरी करा फेशियल, तुमची त्वचाही दिसेल खूप सुंदर

फ्रुट फेशियल म्हणजे काय?
फळांमध्ये असलेले अनेक घटक हे त्वचेसाठी खूपच आवश्यक असतात. फेशियल करताना त्वचेवर होणारा मसाज यामधून फळांचे गुण हे आपल्या त्वचेसाठी पोषक ठरतात.

पपई: आपल्या त्वचेसाठी पपई ही खूप गरजेची मानली जाते. पपईमध्ये पपैन नावाचे एंजाइम असते. यामुळे आपल्या त्वचेला एक्सफोलिएट करता येते. तसेच यामुळे मृत त्वचा काढून टाकण्यास मदत होते.

सफरचंद: आपल्या चेहऱ्यासाठी सफरचंदही खूप गरजेचे आहे. सफरचंदामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते. यामुळे आपल्या त्वचेला पोषण मिळण्यास मदत होते. तसेच सफरचंद चेहऱ्यावर लावल्याने, आपल्या चेहऱ्यावर चमकही येते.

केळी – त्वचेसाठी केळी हे एक नैसर्गिक चमक देण्यासाठी उत्तम उपाय मानला जातो. केळ्यामध्ये  त्वचा एक्सफोलिएट करण्याचे गुणधर्म आहेत, त्यामुळे त्वचेच्या मृत पेशींना एक्सफोलिएट करण्यात मदत होते. तसेच फेसपॅक म्हणून केळीचा वापर केल्यास टॅनिंगची समस्या कमी होऊ शकते. एवढेच नाही तर, केळ्यामध्ये मुरुमविरोधी आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म देखील समृद्ध असतात, ज्यामुळे मुरुम आणि सुरकुत्याची समस्या कमी होते.

संत्री – संत्रे खाण्यासोबतच त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जातात. संत्र्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे संत्र्याचा वापर हा नैसर्गिक ब्लीच म्हणून काम करतो. संत्रे त्वचेवर लावल्यास झटपट चमक येण्यास मदत होते. तसेच, मुरुमांची समस्या आणि वृद्धत्वाचे परिणाम कमी करण्यासाठी हे उपयुक्त मानले जाते.

(कोणतेही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)