गुजरातमध्ये समुद्रात आंघोळ करताना; 3 भाविक बुडाले 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुजरातमधील भावनगर जिह्यातील एका मंदिरात प्रार्थना केल्यानंतर अरबी समुद्रात आंघोळ करताना तीन भाविक बुडाले, तर एकजण बेपत्ता झाला, अशी माहिती अधिकाऱयांनी रविवारी दिली. ही घटना शनिवारी संध्याकाळी भावनगरच्या कोलियाक गावात मोठय़ा संख्येने भाविक जवळच्या बेटावर असलेल्या निश्कलंक महादेव मंदिरात प्रार्थना करण्यासाठी जमली असताना घडल्याचे बचाव पथकाच्या अधिकाऱयाने सांगितले.

सुरुवातीला आनंद जिह्यातील ताखुबा सरवय्या नावाचा एक माणूस मंदिराजवळील पाण्यात स्नान करताना वाहून गेला. नंतर त्याचा शोध लागला. मात्र, त्याला जवळच्या सामुदायिक आरोग्य पेंद्रात नेल्यावर तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. काही वेळानंतर 16 ते 17 वयोगटातील तीन मुलेदेखील पाण्यात आंघोळ करीत असताना बुडाली. बचाव पथकाने ध्रुवराजसिंह जडेजा (वय 16) आणि हर्ष चिमरिया (वय 16) या दोघांचे मृतदेह बाहेर काढले. तर, तिसरी व्यक्ती हार्दिक परमार (वय 17) हा अद्यापि बेपत्ता आहे.