
शासकीय कोट्यातील सदनिका घोटाळाप्रकरणी नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयाने राज्याचे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांना दोषी ठरवले असून, प्रथम वर्ग न्यायालयाने ठोठावलेली दोन वर्षे कारावासाची शिक्षा कायम ठेवली आहे. यातच शिक्षा झाल्यानंतरही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे कोकाटे यांची आमदारकी रद्द का करत नाही, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी विचारला आहे. X वर एक पोस्ट करत त्यांनी हा सवाल विचारला आहे.
X वर पोस्ट करत रोहित पवार म्हणाले आहेत की, “माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा मोठे आहेत?”
ते म्हणाले आहेत की, “गल्लीतील भांडणांची दखल घेऊन विधिमंडळात तात्काळ निर्णय घेतले जातात. मात्र आज जेव्हा निर्णय घेणे गरजेचे आहे, तेव्हा विलंब का केला जातोय? माननीय विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाच्या निर्णयाचा मान राखत तात्काळ माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द करून आदर्श प्रस्थापित करावा.”
माणिकराव कोकाटेंना शिक्षा झाल्यानंतरही कायद्याचा गाढा अभ्यास असणारे विधानसभा अध्यक्ष कोकाटेंची आमदारकी रद्द का करत नाहीत? कायद्यानुसार लोकसभेत राहुल गांधींची आणि महाराष्ट्रात सुनिल केदार यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मग कोकाटेंना वेगळा न्याय का? की कोकाटे कायद्यापेक्षा…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 17, 2025



























































