मोदी सरकारच्या कामाची काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने केली तारीफ, वाचा सविस्तर बातमी

pm-modi-15-aug-2019-new
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज 69 वा वाढदिवस आहे.

आतापर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका करण्यात काँग्रेस नेते जयराम रमेश आघाडीवर होते. त्यांनी एका कार्यक्रमात केलेल्या भाषणामुळे सगळेजण आश्चर्यचकीत झाले आहे. मोदी  पंतप्रधान असताना त्यांनी ज्या पद्धतीने देशाचा कारभार केला ती पद्धत पूर्णपणे नकारात्मक पद्धत नाहीये असं रमेश म्हणाले आहेत. त्यांनी केलेल्या कामाचे महत्व स्वीकार न करणे आणि त्यांना सातत्याने खलनायक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न करणे यामुळे काहीच होणार नाही असंही रमेश यांनी म्हटलं आहे.

जयराम रमेश हे एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या भाषणात ते म्हणाले की ‘2014 ते 2019 या काळामध्ये मोदींनी जे काम केलं आहे त्याचं महत्व समजून घ्यायला हवे. यामुळेच ते सत्तेत पुन्हा आले आहेत.’ मोदी हे अशा पद्धतीने संवाद साधतात की ज्यामुळे जनता त्यांच्याकडे आकर्षित होते आणि त्यांच्याशी जोडली जाते. जर प्रत्येकवेळी आपण मोदींना खलनायक असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांचा मुकाबला करू शकणार नाही असं स्पष्ट शब्दात रमेश यांनी सांगितले आहे.

मोदींकडे जनता का आकर्षित होते याचं उदाहरणही रमेश यांनी दिलं आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही मोदी सरकारच्या दोन योजनांची खिल्ली उडवली होती. यातील एक होती ती म्हणजे उज्ज्वला योजना. या निवडणुकीचा अभ्यास केल्यानंतर ही बाब लक्षात आली की या एका योजनेमुळे कोट्यवधी महिला सरकारच्या कामामुळे प्रभावित झाल्या होत्या. यामुळे 2014 पेक्षाही जास्त यश नरेंद्र मोदी यांना 2019 च्या निवडणुकीत मिळाले. काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात शेतकरी संकटात सापडल्याचा सातत्याने प्रचार केला होता. लोकांनाही ही गोष्ट मान्य होती की शेतकरी संकटात आहे. मात्र शेतकरी मोदी सरकारमुळे संकटात सापडला आहे हे मान्य करायला लोकं तयार नसल्याचं निवडणुकीनंतरच्या अभ्यासातून स्पष्ट झाल्याचंही रमेश यांनी म्हटलं आहे. मोदी इतके सन्माननीय कसे झाले हे तुम्हाला समजून घ्यावेच लागेल असंही रमेश म्हणाले.

 

आपली प्रतिक्रिया द्या