
विकिपीडियाने २०२५ मध्ये आपले ८ टक्के युजर्स गमावले असल्याची माहिती समोर आली आहे. विकिमीडिया फाउंडेशनने जारी केलेल्या अहवालानुसार, ही घट ही कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे झाली असल्याचे सांगितले जाते. AI चॅटबॉट्स आणि सर्च इंजिन्स आता विकिपीडियाच्या डेटावरून थेट उत्तर देत असल्याने युजर्सना साइटवर जाण्याची गरजच भासत नाही. मात्र विकिपीडिया अजूनही AI आणि मोठ्या लँग्वेज मॉडेल्ससाठी (LLMs) विश्वासार्ह डेटा स्रोत म्हणून वापरले जात आहे.
विकिमीडिया फाउंडेशनच्या १७ ऑक्टोबरच्या ब्लॉग पोस्टनुसार, २०२५ मध्ये विकिपीडियाचे ८ टक्क्यांनी युजर्स घसरले आहेत. ही घट इंटरनेटच्या बदलत्या ट्रेंड्समुळे झाली असून, त्यामध्ये AI साधने, सर्च इंजिन्स आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा मोठा वाटा आहे. या प्लॅटफॉर्म्स विकिपीडियाच्या माहितीचा वापर करून थेट उत्तर पुरवतात, ज्यामुळे युजर्स साइटवर जाऊन शोध घेण्याऐवजी तिथेच समाधान मानतात. विशेषत: तरुण युजर्समध्ये ही बदल दिसून येत आहेत, जे आता माहितीसाठी शॉर्ट व्हिडीओ प्लॅटफॉर्म्सकडे वळत आहेत.





























































