
भारतीय कामगार सेनेच्या प्रयत्नामुळे सांताक्रुज पश्चिम येथील विलिंग्डन पॅथलिक जिमखानामधील कामगारांना भरघोस पगारवाढ झाली आहे. पुढील तीन वर्षांकरिता 5550 इतकी पगारवाढ झाल्यामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांनी भारतीय कामगार सेनेचे आभार मानले आहेत.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते- खासदार, भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष अरविंद सावंत आणि कार्याध्यक्ष अजित साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संयुक्त सरचिटणीस संजय कदम व सहचिटणीस मिलिंद तावडे यांच्या नेतृत्वाखाली ही पगारवाढ करण्यात आली. कामगारांना पुढील तीन वर्षांकरिता 5550 इतकी मोठय़ा प्रमाणात पगारवाढ करण्यात आली. त्याचबरोबर डीए ओपन ठेवला असून रजा आणि इतर सुविधा देण्यात आल्या आहेत.
व्यवस्थापनासोबत झालेल्या करारावेळी जिमखान्याचे सरचिटणीस मॉरिस सियारो, खजिनदार बोरीस बुथेलो, युनिट कमिटीचे विजय दळवी, दत्ताराम गुरव, राजेश सोनवणे, प्रसाद पवार यांच्यासह कामगार उपस्थित होते.