विल्सन कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा हरित क्रांतीचा संदेश

81

सामना ऑनलाइन। मुंबई

विल्सन कॉलेजच्या BMS विभागातील विद्यार्थानी CSR_HOPE initiative या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. १ जुलैपासुन सुरु झालेला हा कार्यक्रम ७ तारखेपर्यांत चालणार आहे. समाजाला हरित क्रांतीचे महत्त्व समाजावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

willson-clg1

यासाठी विद्यार्थांना प्राचार्य अॅना निकालजे आणि संयोजिका डॉ.जुलैका होमावजीर यांचे मार्गदर्शन लाभलेले आहे. या कार्यक्रमामध्ये फक्त मुंबईतीलच नव्हे तर देशभरातील प्रत्येक नागरिकांनी एक तरी झाड लावावे असे आवाहन करण्यात येणार आहे. तसेच काही संस्थांमार्फत मोफत रोपे वाटप करण्यात येईल.
विल्सन कॉलेजचे विद्यार्था ४ जुलै रोजी १२०० हुन अधिक रोपे लावणार आहेत.जेणेकरून पुढील पिढीला आरोग्यमय व आनंददायी भविष्य घडवता येईल.

आपली प्रतिक्रिया द्या