विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम; सेरेना-हालेपमध्ये जेतेपदाची झुंज

43

सामना ऑनलाईन, लंडन

अमेरिकेची अनुभवी टेनिसपटू सेरेना विल्यम्स हिने गुरुवारी विम्बल्डन टेनिस ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली. तिने बार्बोरा स्ट्रायकोव्हा हिला 6-1, 6-2 असे सहज पराभूत करीत 11व्यांदा विम्बल्डन टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. आता तिच्यासमोर रोमानियाच्या सिमोना हालेपचे आव्हान असणार आहे. विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी ती रोमानियाची पहिलीच टेनिसपटू ठरलीय.

सेरेना विल्यम्स हिने उपांत्य फेरीच्या लढतीत बार्बोरा स्ट्रायकोव्हाचा धुव्वा उडवत अगदी रुबाबात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता टेनिस विश्वातील या दिग्गज खेळाडू मार्गरेट कोर्टच्या 24 ग्रॅण्डस्लॅम जेतेपदांची बरोबरी करण्याचे वेध लागले आहेत. सेरेना विल्यम्स हिने आतापर्यंत 23 ग्रॅण्डस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला आहे.  दरम्यान, सिमोना हालेप हिने सेमी फायनलच्या लढतीत युक्रेनच्या एलीना स्वितोलिनाला 6-1, 6-3 अशा फरकाने हरवले. सिमोना हालेप हिने 2018 साली फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली असून पाच वेळा तिने ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या