दर्शनाहून परतत असताना रोपवेची ट्रॉली कोसळली, अपघातात महिलेचा मृत्यू; 7 भाविक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवीचं दर्शन घेऊन परतत असताना रोपवेची ट्रॉली कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला तर अन्य भाविक जखमी झाले. झारखंडच्या महासमुंद जिल्ह्यात रविवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आयुषी सत्कर असे मयत महिलेचे नाव आहे. जखमी भाविकांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नवरात्रीनिमित्त बागबाहरा भागातील खलारी गावातील टेकडीवर वसलेल्या ‘खलारी माता मंदिरा’त दर्शनासाठी हे भाविक गेले होते. दर्शन घेतल्यानंतर आठ जण रोपवे ट्रॉलीत बसून टेकडीवरून खाली येत होते. यादरम्यान रोपवेची केबल तुटली आणि ट्रॉली खाली कोसळली. यात 28 वर्षीय आयुषीचा जागीच मृत्यू झाला तर अन्य सात जखमी झाले. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.