ठाण्यात महिलांची सुरक्षितता ऐरणीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, ठाणे

4 ऑगस्ट 2018 भररस्त्यात प्राची धाडे हिच्यावर एकतर्फी चाकू हल्ला झाला आणि यात तिचा बळी गेला. या घटनेने हादरून गेलेले ठाणेकर सावरत असतानच 17 सप्टेंबरला मुंब्य्रात तरुणीवर एकतर्फी प्रेमातून चाकू हल्ला झाला. त्यानंतर अवघ्या 20 दिवसांनंतर 11 नोव्हेंबरला पुन्हा पालिकेच्या परिचारिका प्रशिक्षण केंद्रात याच कारणाने बबिता दुबे नावाच्या महिलेवर चाकूने वार झाले. एकतर्फी प्रेमातून एकामागून एक घटना घडत असताना शहरात रोज कुठे ना कुठे तरुणी, महिला बलात्कार, विनयभंग, छेडछाडीला सामोऱ्या जात होत्या. ठाणे पालीस आयुक्तालय क्षेत्रातील पोलीस ठाण्यांमध्ये गेल्या 11 महिन्यांत दाखल झालेल्या रेकॉर्डनुसार दिवसाला सरासरी 4 बलात्कार, 8 विनयभंग तर दर दोन दिवसांतून एक छेडछाडचे गुन्हे ठाण्यात घडत आहेत. त्यामुळे ठाणे खरंच महिलांसाठी सुरक्षित आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

हायटेक प्रकल्प, टोलेजंग इमारती, झगमगाट सांस्कृतिक कार्यक्रमांच्या रेलचेलमुळे मुंबईनतंर ठाण्यात घर घेणे अनेकजणास पसंद करू लागले आहे. असे असले तरी आजही ठाण्यातील अनेक भाग महिलांसाठी असुरक्षित ठरत असून उलट त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली असल्याचे उघडकीस आले आहे. 2016-17 मध्ये महिलांच्या असुरक्षित रिक्षाप्रवासाने ठाणेकरांना चिंतेत पाडले तर 2018 मध्ये संपूर्ण शहर एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्लेसत्रातून हादरून गेले. सलग तीन महिन्यांत एकतर्फी पेमातून तीन महिलांवर हल्ले झाले. यामध्ये प्राची झाडे हिला जीव गमवावा लागला. याशिवाय लहान मुलींचे लैंगिक सोशन, बलात्कार, विनयभंग, छेडछाडीच्या घटनाही वाढल्या. यामध्ये सर्वाधिक अल्पवयीन मुली अत्याचाराच्या बळी ठरल्या आहेत.

ठाणे पोलीस आयुक्तालय दप्तरी दाखल गुह्यांनुसार ठाणे, वागळे, भिवंडी, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवलीत 334 दिवसांत 1 हजार 136 बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. तर 2 हजार 739 गुन्हे विनयभंगाचे दाखल झाले असून रोडरोमिओंच्या छेडछाडीला 180 जणींना सामोरे जावे लागले आहे.
या गुह्यांची सरासरी काढली तर दिवसाला 4 बलात्कार, 8 विनयभंग तर दर दोन दिवसांतून एक छेडछाडीचे गुन्हे ठाण्यात घडत आहेत.

डेंजर स्पॉट
– कागळे इस्टेट, इंदिरानगर हा परिसर झोपडपट्टय़ांनी क्यापलेला आहे. रात्री उशिरा मद्यपान करून रस्त्याकर धिंगाणा करणे, नाक्यानाक्याकर मद्यप्राशन करून घोळक्यांनी उभे राहणे, गर्दुल्ल्यांचा काकर असल्याने रात्रीच काय दिवसाही तरुणी एकटीने परिसारत जाणे टाळतात.
– मानपाडा रस्त्यावर दिकसभर रहदारी असली तरी संध्याकाळी सातनंतर गर्दुल्ले आणि मद्यपींचा काकर असतो. त्यामुळे रात्री उशिरा या रस्त्याकरून प्रकास करणे महिला टाळतात.
– खेकरा सर्कल मार्गाकर डीमार्टसारखे मोठे रिटेल दुकान आहे. मात्र रात्री नऊनंतर येथील गर्दी ओसरते. हा रस्ता पुढे गुलमोहोरसारख्या मोठय़ा सोसायटय़ांकडे जातो. मात्र डीमार्टचा भाग सोडल्यास सायंकाळी सातनंतर हा रस्ता निर्जन असतो.
– बह्मांड, कापूरबाकडी, घोडबंदर याशिवाय कळवा-खारेगाव मार्ग, मुंब्य्रात एकटय़ाने प्रकास करणाऱ्या महिलेला भुरटे चोर, किकृत नजरेने पाहणारी टोळकी, मद्यपी, गर्दुल्ले, छेडछाड करणारी तरुण मंडळी यांना सामोरे जाके लागते.