गंगा स्नानासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पाटणा

जिवतीच्या शुभपर्वाच्या निमित्ताने गंगेत स्नानासाठी गेलेल्या महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बलात्कार होत असताना व्हिडीओ देखील चित्रीत करण्यात आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी ताबडतोब एका आरोपीला अटक केली असून व्हिडीओ चित्रीत करणारा आरोप अजून फरार आहे. आरोपींना जरी अटक करण्यात आली असली तरी घटना केव्हाची आहे हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये.